करोनानंतर अनेकांचा सिनेमे घरात पाहण्याकडे कल आहे. स्वतःच्या सोयीनुसार वेळ मिळेल तेव्हा सिनेमा पाहणे अनेकांना आवडते. त्यामुळे नवीन सिनेमा ओटीटीवर कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते.
नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर प्रेक्षक आणि समीक्षकांचे कौतुक मिळवले होते. वेगळ्या आणि चटकदार नावामुळे हा सिनेमा सुरुवातीपासूनच चर्चेत होता.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांचे आहे. भोंदू कीर्तनकारांची चर्चा सुरू असलेल्या काळात, खरा कीर्तनकार कोण आणि कीर्तनपरंपरेचा मूळ गाभा काय, याचा विचार करायला हा सिनेमा लावतो.
समता, सामाजिक जाणीव आणि संतविचारांचा संदेश देणारा हा चित्रपट मनोरंजनासोबत प्रेक्षकांना अंतर्मुखही करतो.
चित्रपटाच्या केंद्रस्थानी एका महिला कीर्तनकाराची व्यक्तिरेखा आहे. ती साकारली आहे श्रुती मधुदीप यांनी. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण चित्रपटाचा तोल सांभाळला आहे.
चित्रपटातील गाणी आणि संगीत हे त्याचे आणखी एक बलस्थान आहे. कौस्तुभ देशपांडे यांची खिळवून ठेवणारी कथा आणि खुसखुशीत संवाद यासाठी प्रेक्षक खास दाद देत आहेत.
चित्रपटात किशोर कदम, चिन्मयी सुमीत, शशांक शेंडे, गौरी नलावडे आणि क्षितीश दाते असे अनेक परिचित चेहरे आहेत. त्यांच्यासोबत नवोदित कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत.
समतेची वाट दाखवणारा, आयुष्यातील नकारात्मक गोष्टी वजा करण्याची प्रेरणा देणारा आणि प्रेम व सहजीवनाचा अर्थ उलगडून सांगणारा हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यासारखा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
