‘काकण’नंतर क्रांती रेडकरचा नवा चित्रपट; ‘मैत्रेया’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Maitreya Marathi Movie: फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मराठी चित्रपटप्रेमींसाठी खास भेट समोर आली आहे. ‘मैत्रेया’ या नव्या मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, पोस्टर प्रदर्शित होताच चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

समर टाईम्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले आहे. ‘काकण’ या चित्रपटानंतर त्या पुन्हा एकदा वेगळ्या विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये समर, आयुषी, स्काय आणि रुची या चार पात्रांची झलक पाहायला मिळते. या चौघांच्या आयुष्यातील नातेसंबंध आणि त्यांची मैत्री हीच चित्रपटाची मध्यवर्ती कथा असणार असल्याचे संकेत पोस्टरमधून मिळतात. मात्र, कथानकाबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.

क्रांती रेडकर वानखेडे यांनी सांगितले की, ‘मैत्रेया’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अशा मैत्रीचा प्रवास आहे, जी काळ बदलला तरी मनात कायम जिवंत राहते. या चित्रपटातून मैत्रीचे विविध पैलू, नात्यांमधील गुंतागुंत आणि आयुष्यात येणारी अनपेक्षित वळणे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘काकण’नंतर पुन्हा एक वेगळी आणि भावनिक कथा प्रेक्षकांसमोर आणताना आनंद होत आहे. ‘मैत्रेया’चा हा प्रवास लवकरच प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी संपूर्ण टीम उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू झाली आहे. फ्रेंडशिप डेच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या घोषणेमुळे मैत्रीवर आधारित या नव्या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page