आमिर खान प्रॉडक्शन्सच्या निर्मितीतील हा चित्रपट प्रसिद्ध लेखक असगर वजाहत यांच्या ‘जिस लाहोर नई वेख्या, ओ जाम्या-ए-नई’ या नाटकापासून प्रेरित आहे. 1947 च्या फाळणी काळातील सामान्य लोकांचे आयुष्य, त्यावेळचा हिंसाचार आणि कुटुंबांचे विस्कटलेले संसार याचे चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
ट्रेलरमध्ये सनी देओल एका धाडसी व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो. देशभर दंगली सुरू असताना तो संकटांना न घाबरता ठामपणे उभा राहतो. त्याचा एक दमदार संवादही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. “पंगा घ्यायचा आहे का?” असा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणतो, “इरादा तर नाही, पण आव्हान दिलं तर मी मागे हटणार नाही.”
चित्रपटात शबाना आझमी आणि प्रीती झिंटा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. शबाना आझमी यांचा प्रभावी अभिनय आणि प्रीती झिंटाच्या भूमिकेतून फाळणीच्या काळातील भीती, असुरक्षितता आणि कुटुंबांची घालमेल प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. जळणारी घरे, स्थलांतरासाठी धावपळ करणारे लोक आणि तुटणारी नाती अशा अनेक हृदयस्पर्शी दृश्यांचा ट्रेलरमध्ये समावेश आहे.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात करण देओल आणि अभिमन्यू सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. संगीतकार ए. आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले असून गीते जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत. विशेष म्हणजे, जवळपास तीन दशकांनंतर सनी देओल आणि राजकुमार संतोषी ही यशस्वी जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहे. 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
