मराठी मनोरंजनाला नवं व्यासपीठ; ‘स्टेज’ची घोषणा, अनेक नवे शो लवकरच

मराठी प्रेक्षकांसाठी डिजिटल मनोरंजनाच्या क्षेत्रात एक नवी सुरुवात झाली आहे. ‘स्टेज’ OTT या नव्या व्यासपीठाची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. मराठीत दर्जेदार आणि कौटुंबिक आशय देण्याच्या उद्देशाने हे नवे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहे.

आजच्या काळात OTT प्लॅटफॉर्म्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मराठी प्रेक्षकही डिजिटल माध्यमावर सक्रिय आहेत. मात्र, मराठीत दर्जेदार आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेला आशय कमी प्रमाणात उपलब्ध असल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. याच पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजनासाठी खास ‘स्टेज’ हे व्यासपीठ आणण्यात आले आहे.

अंधेरीतील एका विशेष कार्यक्रमात या OTT प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. अनंत महादेवन, चिन्मय मांडलेकर, क्षितीश दाते, श्रेया बुगडे, पुष्कर जोग यांसारख्या कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली.

२०१९ मध्ये स्थापन झालेलं ‘स्टेज’ हे भारतातील पहिले बोलीभाषा आधारित OTT प्लॅटफॉर्म मानलं जातं. हरयाणवी, राजस्थानी, भोजपुरी आणि गुजराती भाषांमध्ये यश मिळवल्यानंतर आता या प्लॅटफॉर्मने मराठीत पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांमधील कथा आणि कलाकृतींना नवं व्यासपीठ मिळणार आहे.

या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना अनेक नवीन मराठी कलाकृती पाहायला मिळणार आहेत. ‘डेटिंग सेटिंग’, ‘इलू इलू १९९८’, ‘सखे गं साजणी’, ‘प्लस मायनस’, ‘प्रेमाचा तमाशा’, ‘पहिलं प्रेम’ आणि ‘माझीवाली लव्हस्टोरी’ यांसारखे नवे प्रोजेक्ट्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील साहित्य, कथाकार आणि रंगकर्मी यांना देखील या माध्यमातून मोठं व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी कंटेंट अधिक व्यापक पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page