कायदा अजून कसली वाट पाहतोय?, नसरापूर घटनेवर अंकिता वालावलकरची संतप्त पोस्ट

पुण्यातील नसरापूर प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेने समाजमन हादरलं आहे. या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर हिनेही परखड शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.

सोशल मीडियावर स्पष्ट मतांसाठी ओळखली जाणारी अंकिता पुन्हा एकदा या गंभीर विषयावर आक्रमक झालेली दिसली. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अशा घटनांविरोधात केवळ निषेध व्यक्त करून थांबून चालणार नाही, तर ठोस कृतीची गरज असल्याचं म्हटलं आहे.

अंकिताने आपल्या पोस्टमध्ये कायद्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल तिने केला. समाजातील प्रत्येक जण आरोपीच्या विरोधात असताना कायदा अजून कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहे, असा तिचा थेट प्रश्न होता.

तिने पुढे लिहिलं की, अशा घटना एकामागोमाग एक समोर येत आहेत. लोक रस्त्यावर उतरतात, निषेध करतात, आवाज उठवतात; पण काही दिवसांनी पुन्हा दुसरी घटना समोर येते. हे चक्र थांबण्यासाठी कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं तिने नमूद केलं.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये अंकिताने त्या चिमुरडीबद्दल भावना व्यक्त करत “आता तरी आवाज उठवूया” असं आवाहन केलं. लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कोणतीही सहानुभूती नसावी, अशा गुन्ह्यांमुळे केवळ एका कुटुंबाचं नाही तर संपूर्ण समाजाचं नुकसान होतं, असंही तिने म्हटलं.

अंकिताच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. महिलांनी एकत्र येऊन अशा घटनांविरोधात ठामपणे उभं राहण्याची गरज असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page