मंगळवारी सकाळी केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यात हा अपघात झाला. आदूरजवळील पीथुसेरी परिसरात एमसी रोडवर संतोष यांच्या कारची ट्रकसोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, डॉक्टरांनी संतोष यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर त्यांच्या पत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा असलेल्या संतोष के. नायर यांनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी नायक, खलनायक आणि विनोदी अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
संतोष यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 1980 च्या दशकात त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि त्यानंतर अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले.
त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि सहकारी कलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
