Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेला ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट आता चर्चेत आहे. मराठी शाळांची घटती संख्या आणि मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्व या विषयावर आधारित असलेल्या या सिनेमाचं चित्रीकरण अलिबाग आणि परिसरात नुकतंच पूर्ण झालं.
चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर यात कोणते कलाकार दिसणार याविषयीची उत्सुकता संपली आहे. पोस्टरमध्ये चेहरे न दाखवता प्रेक्षकांना आश्चर्याची चाहूल देण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्यासारखे दमदार कलाकार आहेत. विशेष म्हणजे, सोशल मिडियावर लोकप्रिय असलेली प्राजक्ता कोळी या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठीत दिसणार आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त केला. “माझं शालेय शिक्षण रायगडमध्ये झालं आणि हाच चित्रपट मी त्याच भागात चित्रीत करू शकलो, याचा मला प्रचंड आनंद आहे. प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद हा आमच्या टीमसाठी मोठा आधार आहे. ही कलाकारांची भक्कम फौजच या चित्रपटाची खरी ताकद आहे,” असं ते म्हणाले.
क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनीच केलं आहे. प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
