‘तू माझा किनारा’ मध्ये भूषण-केतकीची नवी जोडी, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

Tu Majha Kinara Movie: मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच एक नवी जोडी झळकणार आहे. भूषण प्रधान आणि केतकी नारायण पहिल्यांदाच एकत्र ‘तू माझा किनारा’ या चित्रपटात दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या एकत्र असण्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र पोस्टर रिलीज करत त्यांनी प्रेक्षकांना स्पष्ट केलं की हा त्यांचा पुढील चित्रपट आहे.

या सिनेमाबद्दल फारसं काही उघड झालेलं नाही. त्यांच्या भूमिका काय असतील, कथानक कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे, हे अजूनही गूढच आहे. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणार, इतकं नक्की. साध्या आयुष्यात दडलेले असाधारण प्रश्न या कथेतून समोर येतील, अशी माहिती समोर आली आहे.

भूषण प्रधानने ‘घरत गणपती’, ‘ऊन सावली’, ‘लग्न कल्लोळ’ यांसारख्या चित्रपटांमधून आपली छाप सोडली आहे. तर केतकी नारायणने मराठीसह हिंदी, मल्याळम, तेलुगु अशा विविध भाषांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचे ‘युथ’, ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘अंडरवर्ल्ड’, ‘८३’ यांसारखे चित्रपट गाजले.

‘तू माझा किनारा’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दोघेही कलाकार पहिल्यांदाच एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट फक्त पडद्यावरील कथा नाही, तर प्रत्येकाच्या मनाशी जोडणारा आरसा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page