टायगर श्रॉफवर गोळीबाराची घटना! ड्रायव्हरसह दोघे जखमी;अभिनेता सुखरूप, हल्लेखोर फरार

Tiger Shroff: अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. जुहू परिसरात झालेल्या या घटनेत टायगरचा ड्रायव्हर फिरदौस आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाले आहेत. टायगर श्रॉफ मात्र सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

ड्रायव्हरच्या हाताला गोळी, दोघे जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर फिरदौस याच्या हाताला गोळी लागली. घटनास्थळी उपस्थित असलेली आणखी एक व्यक्तीही जखमी झाली. वृत्तानुसार, जखमी व्यक्ती रिक्षाचालक असल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेत एकूण दोन जण जखमी झाले असून, टायगर श्रॉफ पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती डीसीपी मोहित गर्ग यांनी दिली. ड्रायव्हरची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

तीन हल्लेखोर घटनास्थळावरून फरार

प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारात तीन हल्लेखोर सहभागी होते. गोळीबार केल्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. हल्ल्यामागचं नेमकं कारण काय, तसेच हल्लेखोर कोण आहेत, याबाबत अधिक तपशील समोर येणं बाकी आहे.

मुख्यमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यांनी गोळीबाराच्या घटनेचा तपास वेगाने करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते आणि फरार हल्लेखोरांना कधी पकडलं जातं, याकडे लक्ष लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page