जिकर हाय तर फिक्कर नाय! राहुल जाधव दिग्दर्शित बहिर्जी नाईक चित्रपट आता मोठ्या पडद्यावर!

Bahirji Marathi Movie : स्वराज्याचा “तिसरा डोळा” म्हणून ओळखला जाणारा गुप्तहेर बहिर्जी नाईक आता मोठ्या पडद्यावर येत आहे. त्यांची शौर्यगाथा साकारणाऱ्या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे.

पोस्टरमध्ये एकामागून एक ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे चेहरे दिसतात. त्यांवरील गंभीर भाव आणि भारदस्त लुक पाहून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. पण हे नेमके कोणत्या व्यक्तिरेखा आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीत बहिर्जी नाईकांचं योगदान महत्त्वाचं होतं. शत्रूच्या गोटात प्रवेश करून त्यांची रणनीती जाणून घेणारे ते होते. आपल्या बुद्धीचातुर्याने त्यांनी स्वराज्याच्या मोहिमांना यश मिळवून दिलं.

चित्रपटात त्यांचं हे कार्य, स्वराज्यनिष्ठा आणि धाडस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा ऐतिहासिक चित्रपट अंश मीडिया वर्क्स निर्मित आहे. लेखन युवराज पाटील यांचं असून दिग्दर्शन राहुल जाधव यांचं आहे.

मोशन पोस्टर राहुल जाधव यांनी सोशल मीडियावर रिलीज केलं आहे. “स्वराज्याचा तिसरा डोळा उघडला तर तांडवच होणार.. होशियार ssss आता घराघरात बहिर्जी येणार.. कसा.. कधी.. कुठून..??? अवो ते गुपित त्याच्यापाशीच हाय.. नजर ठेवून रहा फक्त..” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना राहुल जाधव म्हणाले की बहिर्जी नाईकांचं व्यक्तिमत्व जितकं विलक्षण आहे, तितकंच त्यांचं कार्य रहस्यमय आहे. या चित्रपटासाठी त्यांनी ऐतिहासिक संदर्भांचा सखोल अभ्यास आणि संशोधन केलं आहे.

त्या काळातील वातावरण, मोहिमा आणि व्यक्तिरेखांचं जग उभं करण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याची त्यांनी माहिती दिली. “हा केवळ गुप्तहेराचा प्रवास नाही, तर स्वराज्यासाठी सावलीसारखं काम करणाऱ्या असंख्य शूरवीरांच्या योगदानाचा आणि निष्ठेचा प्रवास आहे,” असंही ते म्हणाले.

“जिकर हाय तर फिक्कर नाय” या निर्धाराने बहिर्जींची ही गाथा मोठ्या पडद्यावर साकारत असल्याची त्यांनी सांगितलं. लवकरच प्रदर्शनाची तारीख प्रेक्षकांसमोर आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, चित्रपटातील कलाकारांची नावं, त्यांच्या भूमिका आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे बहिर्जी च्या पुढील घोषणांकडे आणि या चित्रपटाच्या पुढील प्रवासाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page