Tejaswini Lonari: अभिनेत्री तेजस्विनी लोणारी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून तिला मोठं यश मिळालं आणि ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. अलीकडेच तेजस्विनीचा समाधान सरवणकर यांच्यासोबत साखरपुडा झाला असून ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
अशातच तिची एक मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ‘राजमंच’ या युट्युब चॅनलवरील या मुलाखतीत तेजस्विनीनं स्वामी समर्थांचा एक खास अनुभव शेअर केला आहे.
तेजस्विनीला विचारण्यात आलं की, “तुला स्वामी समर्थांबाबत काही अनुभव आला आहे का?” त्यावर ती म्हणाली, “लहानसहान गोष्टींपासून मोठ्या प्रसंगांपर्यंत, स्वामींनी नेहमी मदत केलीय. गाडी बंद पडली, काही जमेनासं झालं, तर त्यांनी शक्य केलं. मी नुकतंच घर घेतलं, लोन मिळत नव्हतं. मी स्वामींना म्हटलं, ‘आता तुम्हीच करा.’ आणि खरंच झालं.”
ती पुढे म्हणाली, “मी त्यांच्याशी भांडतेही. पालखीच्या दिवशी काहीतरी बदललं. दोन महिन्यांनंतर मी वेगळीच तेजस्विनी झाले. प्रत्येकवेळी जेव्हा मला खिन्न वाटतं, तेव्हा मी नव्या ऊर्जेसह उभी राहते. त्या वेळेनंतर मला खात्री पटली की ते माझ्यासोबत आहेत. मला त्यांच्याकडून काही मागायचं नाही, फक्त त्यांनी सोबत राहावं एवढंच.”
तेजस्विनीनं सांगितलं की, या अनुभवानंतर तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. “मी स्वतःशीच स्पर्धा करते,” असं ती हसत म्हणाली.
दरम्यान, तेजस्विनीनं ‘छापा काटा’, ‘गुलदस्ता’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’ अशा सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसेच ती बिग बॉस मराठीमध्येही झळकली होती, पण हाताला दुखापत झाल्याने तिला शो सोडावा लागला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
