Tango Malhar Movie: रिक्षाचालकाचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर; साया दाते दिग्दर्शित चित्रपट १९ सप्टेंबरला रिलीज

मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळीच गोष्ट घेऊन ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. १९ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास यात मांडला आहे.

या चित्रपटातून संगणक शास्त्रज्ञ आणि उद्योजिका म्हणून नाव कमावलेल्या साया दाते मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा त्यांच्याकडेच असून नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.

कथेचा गाभा एका तरुण रिक्षाचालकावर आधारित आहे. मल्हार नावाच्या या तरुणाला अर्जेंटिनातील प्रसिद्ध टँगो डान्स बद्दल अचानक कळतं आणि त्याला नृत्याची आवड निर्माण होते. या नृत्यप्रकारामुळे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर संपूर्ण चित्रपट उभा आहे.

या चित्रपटात नितेश कांबळे, कीर्ती विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी आणि पंकज सोनावणे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची कथा साया दाते आणि मनीष धर्मानी यांनी लिहिली असून छायांकन सुमेध तरडे व ओंकार आठवले यांनी केलं आहे. संकलन क्षमा पाडळकर यांचं असून, संगीत शार्दूल बापट आणि उदयन कानडे यांनी दिलं आहे.

साया दाते यांचा प्रवास तितकाच खास आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित एमआयटी मधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सिलिकॉन व्हॅलीत युट्यूबमध्ये काम केलं. जवळपास दहा वर्षं टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करून त्या भारतात परतल्या आणि पुण्यात स्वतःची कंपनी उभारली. उद्योग क्षेत्रातील यशामुळे फोर्ब्जच्या ‘३० अंडर ३०’ यादीत त्यांना स्थान मिळालं होतं.

चित्रपटांची आवड मात्र लहानपणापासूनच होती. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी ‘On The Other Line’ हा शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केला होता, ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळाली. त्याचबरोबर त्या स्वतः एक उत्तम टँगो डान्सर आहेत. आता ‘टँगो मल्हार’ मधून त्यांनी आपली आवड आणि करिअर यांचा सुंदर संगम घडवला आहे.

‘टँगो मल्हार’ चं कथानक आणि साया दाते यांचा प्रवास दोन्ही तितकंच रोचक असल्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page