Swami Samarth Aarti
Swami Samarth Aarti | आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची:
जय जय सदगुरू स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥
अक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ॥
लीलापाशे बध्द करुनिया तोडिले भवभया रे ॥१॥
यवने पुशिले स्वामी कहां है? अक्कलकोटी पहा रे ॥
समाधिसुख ते भोगुनी बोले धन्य स्वामीवर्या रे॥२॥
जाणसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भव हरा रे ॥
इतुके देई दीन दयाळा नच तवपद अंतरा रे॥३॥
जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥
To check other Marathi Content Creator, click here and Follow Us on Youtube.