Swami Samarth Aarti
Swami Samarth Aarti | आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची:
जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव || धृ ||
तुझे दर्शन होता जाती ही पापे
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते
वैकुंठीचे सुख नाही या परते, जय देव, जय देव || १ ||
जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव || धृ ||
सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा
शरणागत तुज होतां भय पडले काळा
तुेझे दास करिती सेवा सोज्वळा, जय देव, जय देव || २ ||
जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव || धृ ||
मानवरुपी काया दिससी आम्हांस
अक्कलकोटी केला यतिवेषे वास
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास
अज्ञानी जीवास विपरीत भास, जय देव, जय देव || ३ ||
जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव || धृ ||
र्निगुण र्निविकार विश्वव्यापक
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक
अनंत रुपे धरसी करणे मा एक
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख, जय देव, जय देव || ४ ||
जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव || धृ ||
घडता अनंत जन्म सुकृत हे गाठी
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी, जय देव, जय देव || ५ ||
जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव || धृ ||
To check other Marathi Content Creator, click here and Follow Us on Youtube.