Janhvi Killekar: झापुक झुपूक फेम सूरज चव्हाण अलीकडेच विवाहबंधनात अडकला. चुलत मामाच्या मुली संजना गोफणे हिच्यासोबत त्याचं लग्न पार पडलं. कुटुंबातील काही मंडळीच या सोहळ्यात होती. मात्र बिग बॉस ५ मधील स्पर्धक जान्हवी किल्लेकर लग्नात करवली म्हणून उपस्थित होती. ती लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमात सूरजसोबत दिसली आणि अनेक कामंही तिनं स्वतः केली.
सोशल मीडियावर तिचं याच कारणानं कौतुक झालं. पण त्याचवेळी काहींनी तिला ट्रोलही केलं.
जान्हवीनं सूरजला लग्नाचं गिफ्ट म्हणून सोन्याची अंगठी दिली. ही अंगठी देतानाचा व्हिडिओ तिनं इंस्टाग्रामवर शेअर केला होता. अनेकांनी त्यावर प्रेमाने प्रतिक्रिया दिल्या. पण काही लोकांनी “हा सगळा दिखावा आहे” असं लिहित तिला चांगलंच सुनावलं.
यावर एका इन्स्टाग्राम पेजनं पोस्ट करत विचारलं – “जान्हवी किल्लेकर हिनं दिलेली सोन्याची अंगठी खरोखरच दिखावा आहे का?” ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जान्हवी भडकली आणि तिनं स्टोरीवर लिहिलं – “बसससस झालं आता“.
दरम्यान, काही नेटकऱ्यांनी तिला मोठ्या मनाची आहेस, असं म्हणत समर्थनही दिलं.
लग्नातील धावपळ आणि कमी बीपीमुळे जान्हवीची तब्येत बिघडली. तिला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करावं लागलं. नंतर तिनं व्हिडिओ शेअर करून ती आता ठीक असल्याचं सांगितलं.
आश्चर्य म्हणजे या लग्नात सूरजपेक्षा जान्हवीचीच चर्चा जास्त झाली. गर्दी वाढल्यानंतर ती राग व्यक्त करत लोकांना बाजूला होण्याचं आवाहन करताना दिसली. तिचे वेगवेगळे लुक्सही सोशल मीडियावर जोरदार चर्चेत राहिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
