‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याची सोशल मीडियावरील एक खास पोस्ट.
सूरजने नुकताच एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये तो साऊथ इंडियन लूकमध्ये दिसत आहे. पांढरा शर्ट आणि लुंगी घालून, खांद्यावर हात ठेवून तो कॅमेऱ्यासमोर हसताना दिसतो. त्याच्यासोबतची मुलगी गुलाबी-पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये दिसते. केसात गजरा आणि हातात हिरवा चुडा घालून ती पारंपरिक अंदाजात आहे. मात्र, मुलीचा चेहरा फोटोमध्ये लपवलेला आहे.
या पोस्टमध्ये सूरजने फक्त लाल हार्ट इमोजी टाकला आहे. त्यामुळे लग्न ठरलंय का? की हा एखाद्या नवीन प्रोजेक्टचा भाग आहे? याबाबत प्रेक्षकांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
सूरजच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव झाला आहे. “आज काँग्रॅज्युलेशन करायला मिळतंय, हे स्वप्न नाही!”, “भाऊ एकदम जोरात”, “कोण आहे ओ सूरज भाऊ, सांगा ना”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
सूरज चव्हाणच्या या पोस्टनं सोशल मीडियावर लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, खरं काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
