Star Pravah New Serial: स्टार प्रवाहने प्रेक्षकांसाठी आणखी एक सरप्राईज तयार ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वीच झी मराठीने ‘शुभ श्रावणी’ ही नवीन मालिका जाहीर केली होती. त्यानंतर आता स्टार प्रवाहनेही एक नवीन मालिका आणत असल्याचं स्पष्ट झालं. चॅनेलकडून रिलीज झालेल्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढलीय.
प्रोमोमध्ये हॉटेलचं किचन दिसतं आणि एक मुलगी शांतपणे अळूवड्या बनवत असते. अळूची पानं एकावर एक रचताना तिचे हात दिसतात, पण चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे ही नायिका नक्की कोण हा प्रश्न नेटकऱ्यांना सतावत आहे. काहींना ती दिशा परदेशी असल्यासारखी वाटते, तर काहींना एतशा संझगिरीचा चेहरा आठवतो. तरीही चॅनेलने काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
गेल्या काही आठवड्यांत स्टार प्रवाहचा टीआरपी घसरल्याने अनेक मालिकांच्या वेळाही बदलण्यात आल्या. ‘वचन दिले तू मला’ ही मालिका आता १५ डिसेंबरपासून रात्री ९.३० ला दाखवली जाणार आहे. या कथेत मिलिंद गवळी नकारात्मक भूमिकेत तर अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत दिसतील.
दरम्यान, नव्या मालिकेच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीचा चेहरा न दाखवल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. आता ही मालिका नेमकी कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. नवीन मालिका लवकरच स्क्रीनवर दिसण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
