Smriti Mandhana – Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगलीत होणारे लग्न रद्द झाले आहे. आधी हा सोहळा पुढे ढकलल्याची माहिती समोर आली होती, मात्र आता या नात्याचा शेवट अधिकृतपणे स्पष्ट झाला आहे. पलाश मुच्छलने सोशल मीडियावर पोस्ट करून ‘आयुष्यात पुढे जाण्याचा’ निर्णय घेतल्याचं सांगितलं.
पलाशने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “मी माझ्या वैयक्तिक नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.” या पोस्टमध्ये त्याने स्मृतीचे नाव घेतलेले नाही. याआधी स्मृतीनेही आपल्या स्टोरीवर नातं संपल्याचा संकेत दिला होता.
लग्नाआधी सुरू असलेल्या सोहळ्यांदरम्यान पलाशने स्मृतीची फसवणूक केली, अशा चर्चा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. या बद्दल बोलताना पलाश म्हणतो, “माझ्यासाठी पवित्र असलेल्या गोष्टीबद्दल पसरलेल्या निराधार अफवांनी मला खूप त्रास दिला. हा माझ्यासाठी कठीण काळ आहे आणि मी माझ्या मूल्यांवर ठाम राहीन. लोकांनी गॉसिपवर विश्वास ठेवून प्रतिक्रिया देणं थांबवलं पाहिजे.”
पलाशने पुढे लिहिले की, त्याची टीम खोटी माहिती आणि बदनामीकारक कंटेंट पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. “या कठीण काळात साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार,” असंही तो म्हणाला.
पलाश–स्मृतीचं लग्न मोठ्या थाटामाटात होणार होतं. मेंदी, हळद आणि संगीत असे सोहळे पार पडले होते. भारतीय महिला क्रिकेट संघातील अनेक खेळाडू म्हणुन उपस्थित होत्या. मात्र लग्नाच्या सकाळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच दिवशी पलाशचीही प्रकृती खालावल्याचं समोर आलं आणि दोन्ही कुटुंबांनी तातडीने लग्न थांबवलं.
आता दोघांनीही त्यांच्या मार्ग वेगळे केल्याचं स्पष्ट झालं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
