Shiv Thakare: बिग बॉस मराठी सीजन 2 जिंकून लोकप्रिय झालेला शिव ठाकरे आज पुन्हा चर्चेत आहे. मुंबईतील त्याच्या घराला सकाळी अचानक आग लागली. काही महिन्यांपूर्वीच त्याने हे नवं घर घेतलं होतं, आणि आजच मोठी दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना 18 नोव्हेंबरच्या सकाळची आहे. शिव कोलते पाटील वर्व या इमारतीत राहतो. घरातून अचानक धूर निघू लागल्याचं शेजाऱ्यांनी पाहिलं आणि लगेच सर्वांना खबर दिली. सुदैवाने शिवला कोणतीही इजा झाली नाही. मात्र घरातील हॉल आणि काही उपकरणांचे मोठं नुकसान झालं आहे. आग नेमकी कशामुळे लागली, हे अजून समजू शकलेलं नाही.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हॉलचा एक भाग पूर्णपणे काळवंडलेला दिसतो. एसीचा काही भागही जळाल्याचं स्पष्ट दिसत होतं. विशेष म्हणजे, शिव कालच बाहेरगावाहून मुंबईत परतला होता आणि त्यानंतर काही तासातच ही घटना घडली.
शिवने हे घर ‘झलक दिखला जा’ करत असताना विकत घेतलं होतं. तेव्हा परीक्षक फराह खानने त्याचं अभिनंदन करत गणपतीची मूर्तीही भेट दिली होती. मित्रमंडळींसह त्याचा गृहप्रवेशही खूप चर्चेत होता.
अलीकडेच शिव एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला होता. सध्या तो हिंदी प्रोजेक्टवर जास्त लक्ष देत आहे आणि अद्याप कोणत्याही नवीन मराठी कामात दिसलेला नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
