सीमा घोगळेची नवी भूमिका गाजतेय; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत दिसणार सत्तेच्या खेळात रंगलेली ‘पुष्पा’

Tujhyasathi Tujhyasang Serial: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून ओळख मिळवलेली अभिनेत्री सीमा घोगळे सध्या एका वेगळ्याच अवतारात दिसतेय. सन मराठीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या लोकप्रिय मालिकेत त्या ‘पुष्पा’ नावाची खलनायिका साकारत आहेत.

कथेतील माईसाहेब वैदहीचा बदला घेण्यासाठी सतत डाव रचत आहेत. तेजा मात्र वैदहीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या सगळ्यात पुष्पा हा नवा वळण आणणारा पात्र आहे.

सीमा घोगळे सांगतात की, याआधी अनेक नकारात्मक भूमिका केल्या असल्या तरी ‘पुष्पा’ची व्यक्तिरेखा वेगळी आहे. यात अनेक स्तर आहेत आणि ते उलगडताना थोडं दडपण येतं. मात्र दिग्दर्शकांच्या मदतीमुळे ते सहज झालं.

कथेत पुष्पा ही मक्तेदार घराण्याची मोठी सून आहे, पण घरातील निर्णयावर तिचा काहीही अधिकार नाही. सगळं माईसाहेबांच्या हुकमतीवर चालतं. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी ती कुठलीही मर्यादा ओलांडायला तयार आहे. तेजाला ती मुलासारखं जरी मानत असली तरी त्याचाच उपयोग माईसाहेबांना अडचणीत आणण्यासाठी करते.

“ही फक्त खलनायिका नाही, तर सत्तेसाठी झगडणारी स्त्री आहे. माईसाहेबांच्या सावलीत राहून स्वतःचं राज्य उभं करणं हाच तिचा उद्देश आहे,” असं सीमा म्हणाल्या.

या मालिकेत त्या चिन्मय मांडलेकर, विकास पाटील, विनोद लव्हेकर आणि निखिल शेठ यांच्यासोबत काम करत आहेत. नाशिकच्या शांत वातावरणात शूटिंग करण्याचा अनुभव त्यांना खूप आवडला आहे. मुंबईच्या गर्दीपासून दूर, कमी वेळात सेटवरून घरी पोहोचता येणं, हा एक वेगळाच आनंद असल्याचं त्या सांगतात.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page