निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता – सचित पाटीलचा ‘असंभव’ प्रयोग चर्चेत

Asambhav Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिभावान अभिनेता सचित पाटील पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘असंभव’ या रहस्यमय आणि थरारक चित्रपटातून तो एकाच वेळी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून झळकणार आहे.

‘साडे माडे तीन’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘झेंडा’, ‘क्लासमेट्स’, ‘फ्रेंड्स’ अशा चित्रपटांमधून सचितनं आपला अभिनय सिद्ध केला आहे. ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’चं दिग्दर्शन करून त्यानं आपल्या सर्वगुणसंपन्नतेचा ठसा उमटवला होता. आता ‘असंभव’मधून तो नव्या जबाबदाऱ्यांसह परत आला आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘असंभव’च्या टीझरनं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. रहस्य, थरार आणि भावना यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.

सचित म्हणतो, “एकाच वेळी निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय करणे ही माझ्या आयुष्यातली मोठी परीक्षा होती. कथा ऐकल्या क्षणी हा चित्रपट करायचाच ठरवलं. या प्रवासात मला माझा जिवलग मित्र नितीन प्रकाश वैद्यची मोलाची साथ मिळाली. आम्ही दोघांनी मिळून मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटची स्थापना केली. आमच्या टीमच्या विश्वासामुळेच ‘असंभव’ शक्य झाला. मला खात्री आहे, हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवेल.”

या चित्रपटाचं दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून सहदिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केलं आहे. या सिनेमात चार लोकप्रिय कलाकार — सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदीच या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.

‘असंभव’चे निर्माते सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. सहनिर्माते म्हणून शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार यांची नावे आहेत. रहस्य आणि नात्यांच्या गाठी गुंफणारा हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page