दिग्दर्शक रोहन परशुराम कानवडे यांचा ‘साबर बोंडं’ हा चित्रपट आता मराठी प्रेक्षकांसाठी सज्ज झाला आहे. १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभर या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. या सिनेमाने यंदाच्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकून मोठं यश मिळवलं.
या प्रकल्पाला मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील मोठ्या नावांचा पाठिंबा आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, विक्रमादित्य मोटवने आणि अभिनेत्री सई ताम्हणकर कार्यकारी निर्माते म्हणून जोडले गेले आहेत. तर अभिनेता-निर्माता राणा दग्गुबाती यांच्या स्पिरिट मीडिया मार्फत या चित्रपटाचे वितरण होत आहे.
‘साबर बोंडं’ ही कथा आनंद नावाच्या एका शहरी तरुणाची आहे. मैत्री आणि प्रेमाचे सूक्ष्म पैलू उलगडतानाच चित्रपट समाजातील कठोर वास्तवांनाही भिडतो. यात भूषण मनोज, सूरज सुमन आणि जयश्री जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाची खास बाब म्हणजे, जगभरातून आलेल्या तब्बल १७ हजार चित्रपटांमधून सनडान्समध्ये ‘साबर बोंडं’ ने स्थान मिळवलं. त्यामुळे ही दखल फक्त मराठीसाठी नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीसाठीही महत्त्वाची ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय गौरवानंतर भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या ‘साबर बोंडं’ची प्रतिक्रिया आता सर्वांच्या नजरा खेचणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
