नोकरी गेली, संकटं आली… तरीही प्रणित मोरे आज लाखोंचा लाडका

Pranit More: कलर्स टीव्हीचा बिग बॉस सीजन 19 खूप चर्चेत राहिला. या शोमधील अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली, पण सर्वाधिक चर्चा झाली ती प्रणित मोरेची. स्टँडअप कॉमेडी, रेडिओ जॉकी आणि कंटेंट क्रिएशन यामुळे त्याने वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा विनोदी स्वभाव आणि स्पष्ट बोलण्याची शैली प्रेक्षकांना भावली. सलमान खाननेही त्याच्या खेळाचं कौतुक केलं.

प्रणितचा जन्म मुंबईत झाला, पण त्यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आहे. त्याचे वडील एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून काम करायचे, तर आई गृहिणी होती. साध्या घरातून येऊनही प्रणितने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर करिअर घडवलं.

के.जे. सोमय्या कॉलेजमधून त्याने बीएमएसचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर एमबीए पूर्ण केला. त्याचं स्वप्न पायलट होण्याचे होते, पण प्रवेश न मिळाल्याने त्याने एअरक्राफ्ट मेन्टनन्स इंजिनियरिंगचा कोर्स सुरू केला. काही महिन्यांनी त्याने तो कोर्स सोडला.

एमबीए नंतर त्याला नोकरी मिळाली, पण 2021मध्ये नोकरी गेली आणि घरावर आर्थिक संकट आलं. त्यानंतर त्याने स्टँडअप कॉमेडी सुरू केली. हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली आणि त्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळू लागला. 2025 मध्ये त्याने आई-वडिलांसाठी नवीन घर घेतलं, आणि लगेच त्याला बिग बॉसमधून फोन आला.

लहानपणी प्रणित मुंबईतील दादरच्या चाळीत राहत होता. नंतर वडिलांना दुखापत झाल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली आणि कुटुंब नवी मुंबईत स्थलांतरित झाले. त्यानंतर आई-वडिलांनी टिफिनचा व्यवसाय सुरू केला. 2004 मध्ये मोठं नुकसान झालं आणि त्यांना घर व दुकान विकावं लागलं. त्या काळात प्रणित घरोघरी टिफिन पोहोचवायचा.

आज प्रणित मोरे सोशल मीडियावर मोठं नाव आहे. इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आणि युट्युबवर 1 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. बिग बॉस सीजन 19 मध्ये तो सेकंड रनर-अप ठरला आणि प्रेक्षकांचा लाडका झाला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page