या सीझनमध्ये टॉप 5 मध्ये विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद यांचा समावेश होता. मात्र, अंतिम फेरीत तन्वीने बाजी मारली आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
तन्वीच्या विजयानंतर आणखी एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजे राखी सावंत. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
राखीने तन्वीच्या विजयावर आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, तिला आधीपासूनच खात्री होती की तन्वीच जिंकणार. यानंतर तिने थेट सलमान खान याच्याकडे एक खास मागणी केली.
राखीने म्हटलं की, तन्वीला पुढील हिंदी बिग बॉसमध्ये संधी द्यावी. यावर ती मिश्किलपणे म्हणाली की, “मी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन येईन आणि तिची वाट लावेन.” या वक्तव्यावर राखी आणि तन्वी दोघीही हसताना दिसल्या.
दरम्यान, तन्वीला विजेती ठरल्यानंतर ट्रॉफीसोबत १५ लाखांचा बक्षीस देण्यात आला. याशिवाय पु.ना.गाडगीळ अँड सन्सकडून १० लाखांचं व्हाउचर आणि तुनवाल ई-मोटर्सकडून ई-बाईकही देण्यात आली.
तसेच, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची फ्रेम भेट म्हणून देण्यात आली. हा क्षणही विशेष ठरला.
बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून तन्वी चर्चेत होती. तिचा खेळ, तिचं व्यक्तिमत्त्व आणि स्पष्ट बोलण्याची पद्धत प्रेक्षकांना आवडली. कोकणातील या मुलीने आता मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
English Title:
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
