गणेशोत्सवाची दहा दिवसांची उत्साहवर्धक धामधूम पार पडली. घराघरांत बाप्पाचं स्वागत, सुंदर आरास आणि गगनचुंबी मूर्तींमुळे उत्सवाला अधिकच रंगत आली. मात्र विसर्जनानंतरचे काही दृश्यं पाहून अनेकांचं मन व्यथित झालं आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनानंतर किनाऱ्यावर अर्धवट भग्न अवस्थेत पडलेल्या मूर्तींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची विटंबना होत असल्याचं दृश्य उघड झालं.
या प्रकरणी ठरलं तर मग मालिकेतील खलनायिका म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर (प्रिया) हिने तिचं मत व्यक्त केलं आहे. तिने किनाऱ्यावर पडलेल्या मूर्तींचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं –
“जर विसर्जन नीट करता येत नसेल तर एवढ्या मोठ्या मूर्ती आणू नका. फक्त त्रासच होतो… हे खूप दुःखद आहे.”
प्रियाच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. नेटिझन्सनीदेखील “हे वास्तव खूप कडू आहे”, “प्रत्येकाने विचार करायला हवा” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या मालिकेत प्रिया तुरुंगातून सुटण्यासाठी धडपडताना दिसते. पण खऱ्या आयुष्यात मात्र तिच्या भावनिक पोस्टनं गणेशोत्सवाबाबत एक महत्त्वाचा मुद्दा सर्वांसमोर आणला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
