छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण म्हणजे तिचं लग्न. काही दिवसांपूर्वी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती. यामध्ये पूजाचं नाव जोडताच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
पूजाने यापूर्वी या विषयावर मौन बाळगलं होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती पहिल्यांदाच या चर्चांवर बोलली. “मला यावर आत्ता काही बोलायचं नाही. बातमी आली तेव्हा मी सेटवर झोपले होते आणि उठल्यावर मोबाईलवर खूप मिस्ड कॉल्स दिसले. सध्या एवढंच सांगू शकते की जे काही आहे ते हळूहळू कळेल,” असं म्हणत ती लाजली.
यामुळे आता तिच्या आणि सोहमच्या लग्नाच्या बातमीला आणखी जोर आला आहे. यावर्षी बांदेकरांच्या गणपती उत्सवात पूजाही सहभागी झाली होती. तसेच आदेश बांदेकर यांनी “पुढील वर्षी गणेशोत्सवाला सूनेला घेऊन येणार” असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या चर्चांना पुष्टी मिळाल्यासारखं वाटत आहे.
सध्या दोघे डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधतील अशी माहिती समोर येत असून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुण्यातील मूळची पूजा ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. तिचा पहिला टीव्ही शो ‘साजणा’ होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
