Pooja Birari: मराठी मनोरंजनविश्वात सध्या लगीनसोहळ्यांचा सीझनच सुरू आहे. अलीकडे मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांचं लग्न पार पडलं. त्यानंतर कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत यांनीही विवाह केला. आता अभिनेत्री पूजा बिरारीच्या केळवणाचा सोहळाही मोठ्या थाटात साजरा झाला असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या सेटवर पूजाचं केळवण आयोजित करण्यात आलं होतं. संपूर्ण टीमने तिचं मनापासून स्वागत केलं आणि भेट म्हणून साडीही दिली. पूजानेदेखील सुंदर साडी नेसून कार्यक्रमात हजेरी लावली. तिच्या लुकची सर्वत्र चर्चा होते आहे.
सध्या पूजा बिरारी आणि अभिनेता-निर्माता सोहम बांदेकर यांच्या लग्नाबद्दल प्रचंड चर्चा आहे. दोघांनी यापूर्वी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती, पण केळवणानं त्यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या सोहळ्यात पूजाने घेतलेला उखाणा विशेष चर्चेत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये ती म्हणते,
“घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, माझे आहो म्हणजेच सोहम आता होणार माझे मिस्टर!”
उखाणा घेताना पूजा गोड लाजताना दिसली आणि उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं.
सोहम आणि पूजाच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तरी त्यांच्या तयारीला सुरूवात झाल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
