Marathi Serial TRP: मराठी मालिकांची टीआरपी शर्यत पुन्हा एकदा रंगली आहे. छोट्या पडद्यावर टिकून राहण्यासाठी प्रत्येक मालिका जोरदार प्रयत्न करताना दिसते. गेल्या आठवड्यातही ‘ठरलं तर मग’ या मालिकेने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.
सायली-अर्जुनची ही मालिका मागील तीन वर्षांपासून टीआरपीत आघाडीवर आहे. गेल्या आठवड्यात मालिकेत महिपतने २२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताची कबुली दिल्याचा भाग प्रेक्षकांना विशेष भावला. याचा थेट फायदा मालिकेच्या रेटिंगला झाला आणि ती पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचली.
दुसऱ्या क्रमांकावर अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका आहे. सुरुवातीला उशिरा प्रसारित होणारी ही मालिका प्राइम टाइममध्ये आल्यानंतर कायम टॉपमध्ये राहिली आहे. त्यापाठोपाठ ‘नशीबवान’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिका अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.
३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीतील ही टीआरपी यादी BARC इंडियाकडून जाहीर करण्यात आली आहे. काही काळ घसरण झाल्यानंतर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने पुन्हा एकदा टॉप-५ मध्ये प्रवेश केला आहे. १२ डिसेंबरला मालिकेचा शेवट झाला असून, अंतिम भागाचा टीआरपी पुढील आठवड्यात समोर येणार आहे.
दरम्यान, झी मराठीवरील तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ३.८ टीआरपीसह सहाव्या स्थानावर आहे. याच रेटिंगसह ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ही पुढे आहे. ‘कमळी’, ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘तारिणी’ या मालिकांनीही यादीत स्थान मिळवलं आहे.
काही दिवसांपूर्वी कायम टॉपमध्ये असलेली ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका आता दहाव्या स्थानी घसरली आहे. येत्या काळात नव्या मालिकांची एंट्री होणार असून, प्रेक्षकांचा प्रतिसाद कोणाला मिळतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
