Last Stop Khanda Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा…’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आधी या चित्रपटातील ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आता या चित्रपटाचं रंगीबेरंगी पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.
या चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर आणि अभिनेत्री जुईली टेमकर ही नवी जोडी झळकणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून, त्याची आतुरता वाढली आहे.
‘प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट’ या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट प्रदीप मनोहर जाधव यांनी निर्माण केला आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी प्रस्तुती केली असून, सहनिर्माते अमृता सचिन जाधव आहेत. दिग्दर्शन विनित परुळेकर यांनी केले असून, कथा आणि पटकथा श्रमेश बेटकर यांनी लिहिली आहे.
या चित्रपटात निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे यांच्यासह अनेक कलाकार आहेत. पाहुणे कलाकार म्हणून धनश्री काडगावकर आणि प्रभाकर मोरे यांची विशेष उपस्थिती असेल.
संगीताला श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांनी स्वर दिले आहेत. छायांकन हरेश सावंत यांचे असून, कलादिग्दर्शन केशव ठाकुर यांनी केले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा…’ ही कथा एका तरुणाच्या प्रेमप्रवासाची असली, तरी ती प्रत्येकाला आपली वाटेल अशी आहे. त्यामुळे कुटुंबासोबत पाहण्याजोगा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी २१ नोव्हेंबरला सज्ज होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
