Janhvi Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपासून तिचं आणि बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांचं लग्न लवकरच होणार अशी चर्चा आहे. आता जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
जान्हवीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं — “२९ ऑक्टोबर तारीख सेव्ह करा…” आणि त्यासोबत हार्ट, डान्सिंग गर्ल आणि फ्लाइट इमोजी शेअर केले. काही वेळातच तिनं ही पोस्ट डिलीट केली, पण तोपर्यंत ती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. चाहत्यांनी लगेचच अंदाज लावायला सुरुवात केली — जान्हवी लग्नाची तयारी करतेय का?
तथापि, याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. काही चाहत्यांचं मत आहे की ‘चालबाज इन लंडन’ या तिच्या आगामी सिनेमाची घोषणा २९ ऑक्टोबरला होऊ शकते. त्यामुळे तो सिनेमाचा अनाऊंसमेंट पोस्ट असू शकतो, असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय.
जान्हवीने अद्याप काही स्पष्ट केलं नसल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढतच आहे. शिखर पहाडियासोबत तिचं नाव बऱ्याच काळापासून जोडलं जात आहे आणि ते दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. त्यामुळे ही पोस्ट पाहून चाहत्यांनी लग्नाचा तर्क लावणं स्वाभाविक ठरलं आहे.
दरम्यान, कामाच्या आघाडीवर बोलायचं तर जान्हवी नुकतीच ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या रॉम-कॉम चित्रपटात दिसली. याआधी ती ‘धडक’, ‘रुही’, ‘गुंजन सक्सेना’, ‘देवारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
