गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं नवं गाणं ‘सोनचाफा’ सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजतंय. ‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ या ओळींनी सजलेलं हे गाणं चाहत्यांना अक्षरशः थिरकायला भाग पाडत आहे.
गौतमीच्या मोहक अदा आणि तिच्या नृत्यशैलीने या गाण्याला वेगळंच आकर्षण मिळालं. नवरात्रोत्सवाच्या काळात ‘सोनचाफा’ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी गौतमीच्या डान्सवर लोकांनी ताल धरला, तर तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
‘साईरत्न एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. या गाण्याचे निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर, तर दिग्दर्शक अर्चित वरवडे आहेत. संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं असून, गायिका मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात हे गाणं अधिकच खुललं आहे. गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत.
गौतमीने याच प्रॉडक्शनसाठी यापूर्वी ‘सुंदरा’ आणि ‘कृष्ण मुरारी’ ही दोन गाणी केली होती. दोन्ही गाण्यांना मिळालेलं प्रेम पाहता, ‘सोनचाफा’लाही प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळतोय.
गाणं प्रदर्शित झाल्यानंतर गौतमी अनेक कार्यक्रमांमध्ये यावर थिरकताना दिसली. तिचा लूक आणि डान्स परफॉर्मन्स चाहत्यांच्या पसंतीस पडला. सोशल मीडियावर या गाण्याचे रील्स आणि क्लिप्स अक्षरशः ट्रेंड होत आहेत.
दरम्यान, अलीकडेच घडलेल्या तिच्या कार अपघात प्रकरणात गौतमीला क्लिनचीट देण्यात आली आहे. याबाबत तिने ७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेतली होती. अपघाताच्या बातम्यांनंतरही गौतमीने ‘सोनचाफा’च्या यशाने पुन्हा साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
