रणवीर सिंहचा सुपरहिट ‘धुरंधर’ घरबसल्या पाहता येणार, कधी होणार रिलीज?

Dhurandhar OTT Release: चित्रपटगृहात तुफान यश मिळवल्यानंतर आता वर्षातील सर्वात चर्चेत असलेला चित्रपट ‘धुरंधर’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. यासाठी तब्बल 130 कोटींची ओटीटी डील झाल्याचं सांगितलं जात आहे. ही मुख्य अभिनेत्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात महाग डील मानली जात आहे.

ओटीटी रिलीजबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की 30 जानेवारी 2026 रोजी ‘धुरंधर’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होऊ शकतो. प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ने अक्षरशः इतिहास रचला आहे. अवघ्या 12 दिवसांत भारतात 400 कोटींच्या पुढे कमाई झाली. तर वर्ल्डवाईड कलेक्शन 500 कोटींच्या पार गेलं आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची कमाई आणखी वेगाने वाढली. दुसऱ्या सोमवारी 30.5 कोटी आणि मंगळवारी 30 कोटींची कमाई नोंदवली गेली.

या यशानंतर रणवीर सिंहने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. हा चित्रपट केवळ सिनेमा नसून एक भावना असल्याचं त्याने म्हटलं. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे यश मिळाल्याचं रणवीरने नमूद केलं.

चित्रपटात दमदार भूमिकेत दिसलेल्या संजय दत्तनेही प्रतिक्रिया दिली आहे. चांगली टीम आणि मजबूत कथा असेल तर यश मिळतंच, असं तो म्हणाला. बॉक्स ऑफिसपेक्षा प्रेक्षकांच्या टाळ्या आपल्यासाठी महत्त्वाच्या असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page