Dharmendra: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अखेर रुग्णालयातून घरी परतले आहेत. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दीर्घ उपचारांनंतर अखेर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी डॉक्टरांनी धर्मेंद्र यांची तब्येत सुधारल्याचं सांगितलं आणि त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. कुटुंबाने लगेच निर्णय घेत त्यांना रुग्णवाहिकेतून घरी नेलं. रुग्णालयाबाहेरचा त्यांचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
८९ वर्षीय धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या उपचारादरम्यान सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, आर्यन खान, गोविंदा आणि अमीषा पटेल यांसारखे कलाकार त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.
मंगळवारी मात्र सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर हेमा मालिनी यांनी स्वतः ट्विट करत स्पष्ट केलं की, “धर्मेंद्र ठीक आहेत, अशा अफवा पसरवू नका.” त्यांच्या मुलगी ईशा देओल हिनंही इन्स्टाग्रामवरून वडिलांच्या आरोग्याविषयी अपडेट शेअर करत चाहत्यांना धीर दिला.
अनेकांनी त्यांच्या पुनर्प्राप्तीला “He-Man चं पुनरागमन” असं संबोधलं आहे. धर्मेंद्र आता घरी विश्रांती घेत आहेत आणि त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
