Actor Dharmendra: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या प्रकृती अस्वस्थ असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यानं त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
31 ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र नंतर प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं समजतंय, पण त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून अधिकृत निवेदन आलेलं नाही.
याआधी 3 नोव्हेंबरला धर्मेंद्र यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना पापाराझींनी विचारलं होतं की, “सर्व ठीक आहे का?” त्यावर त्या फक्त हसल्या आणि म्हणाल्या, “ठीक आहे.” मात्र आता त्यांच्या प्रकृतीविषयी पुन्हा चिंता वाढली आहे.
अलीकडेच एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांच्या डोळ्यांची कॉर्निया ट्रान्सप्लांट सर्जरी झाली होती. त्यावेळी त्यांनी “माझ्यात अजून दम आहे, मी ठीक आहे,” असं म्हणत चाहत्यांना दिलासा दिला होता.
वयाच्या ८९ व्या वर्षीही धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय आहेत. नुकतेच ते शाहिद कपूर आणि कृती सेनॉनसोबत ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात दिसले होते. लवकरच ते श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत झळकणार आहेत.
धर्मेंद्र यांनी ६० आणि ७० च्या दशकात हिंदी सिनेमावर अधिराज्य गाजवलं होतं. आजही त्यांचा चाहतावर्ग प्रचंड आहे. सध्या चाहते सोशल मीडियावरून त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत की, ते लवकरात लवकर बरे व्हावेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
