Dhananjay Powar Reacts to Suraj Chavan: ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण अलीकडेच विवाह बंधनात अडकला. त्याच्या लग्नातील विधी आणि केळवणाचे फोटो-वेडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरजसाठी बांधलेल्या नव्या घराचे फोटोही सर्वत्र चर्चेत आले.
सूरजच्या लग्नाला त्याचे सहस्पर्धक म्हणजेच जान्हवी किल्लेकर, पुरुषोत्तमदादा पाटील आणि डीपी दादा म्हणून ओळखले जाणारे धनंजय पोवारही उपस्थित होते. मात्र आता एका वेगळ्या कारणाने सूरज आणि धनंजय पोवार सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
धनंजय पोवार यांनी अलीकडेच एक व्हिडीओ पोस्ट करून सूरजच्या घरातील फर्निचरच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. बिग बॉसच्या घरात असतानाच त्यांनी सूरजला त्याच्या नव्या घरासाठी सोफासेट गिफ्ट देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. पण नंतर सूरजने दुसऱ्याच व्यक्तीकडून सोफासेट घेतल्याने त्यांना निराशा झाली, असे त्यांनी सांगितले.
धनंजय म्हणाले,
“सूरजने मला कॉल केला होता, कसं करू या म्हणून. मी त्याला वारंवार लोकेशन, हॉलचे फोटो आणि माप विचारले होते. पण त्याने उशिरा माहिती दिली आणि अखेरीस त्याने दुसऱ्या ठिकाणाहून सोफा घेतल्याचा मला समजला. लोक मात्र मला ट्रोल करतायत की मी मतांसाठी गिफ्ट देतो.”
व्हिडीओमध्ये ते पुढे म्हणाले,
“मला सांगितलं असतं, तर काही वाईट नव्हतं. आजही मी सोफासेट देण्यासाठी तयार आहे. पण त्यानेच आम्हाला किंमत द्यायला हवी. त्याने मला आधी सांगितलं नाही, त्यामुळे आता मला जाब विचारू नका.”
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सूरज आणि डीपी दादा यांच्या नात्यावर चर्चा रंगली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
