Sonali Raut: बिग बॉस मराठी 6 चं दुसरं एलिमिनेशन नुकतंच पार पडलं. या आठवड्यात अभिनेत्री सोनाली राऊत घराबाहेर पडली. शोमधून बाहेर आल्यानंतर तिनं एका मुलाखतीत तिच्या तब्येतीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
सोनालीनं ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, पहिल्या आठवड्यात तिचा अनुभव चांगला होता. काही स्पर्धकांना तिच्याबद्दल आधीपासून माहिती होती. त्यांना वाटत होतं की भांडण झालं तर ते तिच्याशीच होईल. तिच्या मते, पहिल्या आठवड्यातील वाद तिच्याभोवतीच सुरू झाले आणि काही गोष्टी आधीच ग्रुपमध्ये ठरवलेल्या वाटत होत्या.
पुढे बोलताना सोनाली म्हणाली की, पहिल्याच आठवड्यात तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तिला इन्फेक्शन झालं. घरात राहणं खूप वेगळं असतं. गार्डन एरिया देखील उघडा नव्हता. सर्व स्पर्धक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आले होते. एकत्र राहिल्यामुळे कुठे ना कुठे हायजिनवर परिणाम झाला आणि त्याचाच परिणाम तिच्या आरोग्यावर झाला.
या आजारामुळे तिच्या गेमवरही परिणाम झाला. ती दुसऱ्या आठवड्यात इतरांपासून दूर राहू लागली. ती कोणत्याही ग्रुपमध्ये सहभागी झाली नाही, असं तिनं सांगितलं.
टास्क न करण्यामागचं कारण सांगताना सोनाली म्हणाली की, घरात सगळ्यांनीच तिची काळजी घेतली. पण तिनं स्वतःही स्वतःची काळजी घेतली. ती शेणाचा टास्क केला नाही, कारण त्याचा तिच्या तब्येतीवर वाईट परिणाम होईल हे तिला माहीत होतं. तिनं वारंवार कपडे बदलायला मागितले, पण तिला काय होत आहे हे कोणालाच नीट समजत नव्हतं.
डॉक्टर आले होते, औषधं दिली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर तिला घराबाहेर जाऊन उपचार घ्यावे लागले. आताही तिची ट्रिटमेंट सुरू आहे, असं सोनालीनं सांगितलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
