Bigg Boss Marathi 6 विषयी चाहत्यांची उत्सुकता अखेर पूर्ण झाली आहे. कलर्स मराठीने नवा प्रोमो शेअर करत सहाव्या सीझनची घोषणा केली. काही दिवसांपासून सुरू असलेले अंदाज आता खरे ठरले आहेत. चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे, कारण शोचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
कलर्स मराठीने पोस्ट केलेल्या छोट्या टीझरमध्ये “स्वागतासाठी व्हा तयार” असा संदेश देत सीझन 6 ची झलक दाखवली. प्रोमो पाहताच प्रेक्षकांकडून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. USP, थीम, घराची रचना, सदस्य कोण असतील, आणि सर्वात महत्त्वाचं — होस्ट कोण असणार? हे अजून स्पष्ट झालेले नाही.
रितेश देशमुख पुन्हा सूत्रसंचालन करणार का, की महेश मांजरेकर यांच्याकडे सूत्रे जाणार, यावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. रितेश असेल तर ‘भाऊचा कट्टा’ पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.
टीझरमध्ये यंदा खास लक्ष वेधलं ते ‘दरवाजा’ या संकेताकडे. एका नाही तर अनेक दरवाज्यांची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या वेळचा गेमप्ले कसा असेल, कोणते ट्विस्ट असतील, हे शो सुरू झाल्यावरच कळणार. हा सीझन कलर्स मराठीसोबत JioHotstar वरही पाहता येणार आहे.
दरम्यान, प्रेक्षक सध्या बिग बॉस हिंदीच्या सीझन 19 मध्ये गुंग आहेत. रिपोर्टनुसार, 7 डिसेंबर रोजी हिंदी पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. त्यामुळे हिंदी सीझन संपताच ‘Bigg Boss Marathi 6’ प्रेक्षकांसमोर येईल, अशी चर्चा रंगते आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
