Bigg Boss Hindi: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? व्हिडीओ पाहून चाहते झाले कन्फ्यूज

Ankita Walawalkar Kokanheartedgirl : ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मराठी बिग बॉसच्या फिनालेपर्यंत पोहोचलेली अंकिता, जरी विजेतेपद मिळवू शकली नाही तरी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.

आता अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात ती म्हणताना दिसतेय की, “आज माझी बिग बॉस हिंदीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होतेय.” तिने चाहत्यांना प्रेम आणि आशीर्वाद देत या प्रवासासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं. पण व्हिडीओच्या शेवटी असा ट्विस्ट आला की नेटकरी अवाक झाले.

खरं तर हा सगळा प्रसंग स्वप्न ठरतो. अंकिताचा नवरा कुणाल तिला उठवतो आणि तेव्हा कळतं की बिग बॉस हिंदीतील एन्ट्री ही फक्त तिच्या स्वप्नातली गोष्ट होती.

अंकिताच्या या मजेदार व्हिडीओवर चाहते भन्नाट कमेंट्स करत आहेत. कुणी लिहिलं, “आम्हीसुद्धा खूप उत्सुक होतो, पण हे काय झालं!” तर कुणी म्हणालं, “तू गेलीस तर जबरदस्त खेळशील.” एका युजरने तर चक्क लिहिलं, “अर्धा व्हिडीओ पाहून हॉटस्टार डाऊनलोड केला, पण शेवटी कळलं स्वप्न होतं.”

नेटकऱ्यांच्या या रिऍक्शनवरून स्पष्ट दिसतंय की, प्रेक्षकांना अंकिताला हिंदी बिग बॉसमध्ये पाहायची खूप इच्छा आहे.

अंकिता बिग बॉस मराठीमध्ये तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि स्मार्ट गेमप्लेमुळे चर्चेत आली होती. शो संपल्यानंतर तिने संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्न केलं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page