बिग बॉसमध्ये जाण्यावर अमृता खानविलकरची स्पष्ट प्रतिक्रिया, वक्तव्यामुळे चर्चा

Amruta Khanvilkar: सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. या शोमुळे अनेक कलाकार पुन्हा चर्चेत येतात. काही कलाकार या शोमध्ये जाण्यास उत्सुक असतात, तर काही जण त्यापासून दूर राहणं पसंत करतात. आता अभिनेत्री अमृता खानविलकर हिचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

अमृताने नुकतीच Filmigyanला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला बिग बॉसमध्ये जाण्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर अमृता म्हणाली की, तिने अनेक रिअॅलिटी शो केले आहेत, पण बिग बॉसबाबत तिच्या घरच्यांचा विरोध आहे.

ती म्हणाली, “माझ्या घरच्यांना वाटतं की, मी बिग बॉसमध्ये गेले तर एकतर कोणाला तरी मारेन किंवा स्वतः मार खाऊन येईन.” तिचं हे विधान ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं.

अमृता पुढे म्हणाली, “मी कोणाकडून मार खाणार नाही, हे नक्की. पण मला हा शो करायचा नाही. काही गोष्टी पडद्यामागेच चांगल्या दिसतात.” त्यामुळे सध्या तरी तिचा बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, अमृता सध्या तिच्या ‘तस्करी’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दुसरीकडे, बिग बॉस मराठी ६ मध्ये सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. काही स्पर्धक आधीच बाहेर गेले आहेत, तर उर्वरित सदस्यांमध्ये स्पर्धा अधिक रंगत चालली आहे. आता पुढे शोमध्ये कोणाची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page