फर्जंद, आणि….डॉ. काशिनाथ घाणेकर, स्माईल प्लीज, धुरळा आणि पिकासो यांसारख्या मराठी चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची वेगवेगळी रूपं दाखवली आहेत. आता त्यांचे चाहते त्यांना नव्या हिंदी भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
मराठी नाटकांपासून सिनेमांपर्यंत प्रवास करणारे प्रसाद ओक यांनी अभिनेत्याच्या आणि दिग्दर्शकाच्या दोन्ही भूमिकांत प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या कारकिर्दीतील धर्मवीर चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांची भूमिका विशेष गाजली होती आणि प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती.
दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या कच्चा लिंबू चित्रपटाला 65 व्या राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी हिरकणी आणि चंद्रमुखी या चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं आहे.
नव्या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन आलोक नाईक करत असून राज झकेरियास यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. या सिनेमात प्रसाद ओकसोबत झैन खान दुर्रानी, तारे जमीन पर फेम दर्शील सफारी, कबीर दुहान सिंग, राहूल सिंग, आलीशा खान, आयुष त्यागी, सौम्या श्रीवास्तव, अजित कोश्य आणि विठ्ठ्ल काळे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
गोपी सुंदर यांनी संगीत दिलं असून अनिरुद्ध चॅटर्जी यांनी पटकथा लिहिली आहे. सायबर – द बिगिनिंग हा वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट असल्याचं सांगितलं जातंय.
मात्र प्रसाद ओक या सिनेमात कोणती भूमिका साकारणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना त्यांच्या नव्या हिंदी अंदाजाची उत्सुकता लागली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
