नितेश तिवारी दिग्दर्शित हा भव्य चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सुरुवातीलाच त्याने चाहूलख्यातील आकडे गाठले आहेत.
पडद्यावर रामाची भूमिका रणबीर कपूरने साकारली आहे. भारतासह जगभरात पिढ्यानपिढ्या पूजनीय असलेल्या श्रीरामाचे हे रूप पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरकडे धाव घेत आहेत.
रावणाच्या भूमिकेत पॅन-इंडिया सुपरस्टार यश झळकतोय. सई पल्लवीने सीतेची भूमिका साकारत या व्यक्तिरेखेला साधेपणा, ताकद आणि करुणेचा स्पर्श दिला आहे.
मल्याळम अभिनेत्री शोभना या चित्रपटात कैकेयीच्या भूमिकेत आहे. जुन्या ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अरुण गोविल य या चित्रपटात राजा दशरथाच्या भूमिकेत परतले आहेत.
रवी दुबे लक्ष्मण, अजिंक्य देव विश्वामित्र, कुणाल कपूर इंद्रदेव आणि रकुल प्रीत सिंग शूर्पणखा यांच्या भूमिकेत आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील ही सर्वात मोठी स्टारकास्ट म्हणून चर्चेत आहे.
या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राईम फोकस स्टुडिओ, आठ वेळा ऑस्कर विजेता व्हीएफएक्स स्टुडिओ डीएनईजी आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांनी मिळून केली आहे. दृश्य परिणामांची जबाबदारीही डीएनईजीने सांभाळली आहे.
चित्रपट मल्याळम, हिंदी, कन्नड, तेलुगू आणि तमिळ अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्सने घेतली आहे, तर उत्तर भारतात धर्मा प्रॉडक्शन हा चित्रपट प्रदर्शित करत आहे.
ऑस्कर विजेते संगीतकार हान्स झिमर आणि ए.आर. रहमान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. चित्रपटाची पटकथा श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे.
‘दंगल’ चित्रपटातून जगभरात बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडणारे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी भारतीय संस्कृती आणि भावनांशी जोडलेली ही कथा अत्यंत सुंदरपणे मांडली आहे.
“रामायण ही केवळ एक कथा नसून ती आपल्या जीवनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारताचे हे महान महाकाव्य त्याच्या संपूर्ण भव्यतेसह जगासमोर मांडणे हे आमचे ध्येय आहे,” असे निर्माता नमित मल्होत्रा यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
दोन भागांत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा हा पहिला भाग आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या आणि मोठ्या प्रोजेक्ट्सपैकी एक म्हणून हा चित्रपट चर्चेत आहे.
14 दिवसांत गाठलेला हा आकडा पुढे किती वाढतो, हे पाहणे बाकी आहे. चाहते आता पुढील भागाची प्रतीक्षा करू लागले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
