अवघ्या २१व्या वर्षी घनश्याम दरोडेने बुक केलं स्वतःचं घर; म्हणाला, ‘आई-बाबांच्या त्यागाला दिलेली ही पहिली परतफेड’

Ghanshyam Darode Home: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे प्रसिद्धी मिळवलेला छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो आपल्या आयुष्यातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता घनश्यामने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

अवघ्या २१व्या वर्षी घनश्यामने स्वतःचं पहिलं घर बुक केलं आहे. या खास क्षणाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तो घराच्या कागदपत्रांवर सह्या करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये घनश्याम म्हणतो, “आज काय बोलू ते कळत नाहीये, डोळ्यांत पाणी येतंय. तुमच्या प्रेमापोटी मी आज इथपर्यंत पोहोचलोय.”

यानंतर घनश्यामने आपल्या आई-वडिलांचे आभार मानत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याने सांगितलं की, वयाच्या २१व्या वर्षी स्वतःच्या हिंमतीवर त्याने हे पहिलं घर बुक केलं. आई-वडिलांकडून एक रुपयाही न घेता मिळवलेलं हे घर त्याच्या मेहनतीचं यश असल्याचं त्याने म्हटलं आहे.

मात्र, या यशामागे केवळ आपली मेहनत नसून आई-बाबांचा आयुष्यभराचा त्याग असल्याचं घनश्यामने सांगितलं. त्याच्या प्रत्येक गरजेसाठी आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या आणि त्याचं भविष्य घडवण्यासाठी स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवली, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं.

“आज घराच्या चाव्या माझ्या हातात आहेत. पण या घराच्या प्रत्येक विटेत आई-बाबांच्या त्यागाचा एक तुकडा आहे,” अशा भावना घनश्यामने व्यक्त केल्या.

पुढे त्याने लिहिलं की, आई-बाबांनी आयुष्यभर त्याला घर दिलं आणि आता त्यांच्या संस्कारांमुळे आपण स्वतःचं घर उभं करू शकलो. ‘ही माझी कमाई नाही, ही तुमच्या त्यागाला दिलेली माझी पहिली छोटीशी परतफेड आहे’, असं म्हणत त्याने हा खास क्षण आई-वडिलांना समर्पित केला.

घनश्यामच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. अनेकांनी त्याला नव्या घरासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

घनश्याम दरोडे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्यानंतर घराघरात पोहोचला. त्याला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, घनश्यामने अनेकदा या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page