या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. 27 नोव्हेंबर 2026 रोजी ‘मिरांडा वॉर्निंग’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रचे कल्पक जोशी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
सचिन धोत्रे यांनी यापूर्वी 2023 मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता ‘मिरांडा वॉर्निंग’मधून त्यांनी सस्पेन्स आणि थ्रिलर प्रकारातील वेगळी कथा मांडली आहे. रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे.
चित्रपटाची कथा एका फार्महाऊसवर घडलेल्या खुनाच्या घटनेपासून सुरू होते. या घटनेनंतर खुनाचा तपास सुरू होतो आणि त्यातून अनेक घडामोडी समोर येतात. या तपासादरम्यान नेमकं काय घडतं, हे चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
आदिनाथ कोठारे या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. खुनाचा तपास करणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका त्याने साकारली आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेसोबतच संपूर्ण स्टारकास्टही लक्षवेधी आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील सस्पेन्स आणि थ्रिलर प्रकाराला वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ‘मिरांडा वॉर्निंग’मधून करण्यात आला आहे. कथानक, कलाकारांचा अभिनय आणि तांत्रिक बाजू या चित्रपटाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये आहेत.
फार्महाऊसवरील खून, त्यानंतर सुरू होणारा तपास आणि या प्रकरणामागचे गूढ यामुळे ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आता 27 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
