या संगीतिकेची खास बाब म्हणजे, संपूर्ण सादरीकरणात तब्बल 21 कलाकार सहभागी होणार आहेत. पारंपरिक संवादांऐवजी गीत, संगीत, अभिनय आणि रंगमंचीय हालचालींच्या माध्यमातून चाळीतील जीवन प्रेक्षकांसमोर उभं केलं जाणार आहे.
पु. ल. देशपांडे यांनी आपल्या लेखणीतून चाळसंस्कृतीतील माणुसकी, विनोद, संघर्ष आणि नात्यांतील जिव्हाळा जिवंत केला होता. त्याच भावविश्वाला जपत आधुनिक रंगभाषेच्या माध्यमातून ही संगीतिका साकारण्यात आली आहे.
या संगीतिकेचं मूळ लेखन आणि संगीत पु. ल. देशपांडे यांचं असून, निर्मिती कपीश जोशी यांनी केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी देवेंद्र भोमे आणि योगेश सप्रे यांनी सांभाळली आहे. तर संगीत दिग्दर्शन देवेंद्र भोमे यांचं असून, नाट्यरूपांतर योगेश सप्रे यांनी केलं आहे.
या संगीतिकेत पंढरीनाथ कांबळे, अजित परब, मिलिंद जोशी, आशुतोष मुंगळे, अंजली मराठे, शमिका भिडे, स्वरांगी मराठे, केतन पवार, वज्रांग आफळे, मधुरा आफळे, तन्वी परांजपे, इशिता सावळे आणि साक्षी देशपांडे यांच्यासह अनेक कलाकार भूमिका साकारणार आहेत.
याशिवाय मंदार बगाडे, ओमकार जोशी, सई जोशी, सिद्धी देशपांडे, तनिष्का जोशी, दीप वैद्य, स्वप्नील कुंभार आणि केदार जाधव हे वाद्यवृंद कलाकार या संगीतिकेला संगीताची साथ देणार आहेत.
नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना सुजय भडकमकर, वेशभूषा गायत्री चक्रदेव आणि नृत्यरचना मधुरा आफळे यांनी सांभाळली आहे. पारंपरिक मराठी संगीत रंगभूमीचा वारसा आणि आधुनिक सादरीकरणाचा संगम असलेली ही संगीतिका पुलंच्या चाहत्यांसह नव्या पिढीतील प्रेक्षकांनाही आकर्षित करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
