उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाने पाचव्या दिवशी भारतात सुमारे 8.35 कोटी रुपये नेट कमावले. यासह पाच दिवसांतील एकूण नेट कलेक्शन 77.65 कोटी रुपयांवर, तर ग्रॉस कमाई 92.63 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
विशेष म्हणजे, चौथ्या दिवशी चित्रपटाने सुमारे 8 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी कमाईत वाढ झाल्याने चित्रपटाने आठवड्याच्या मध्यात कमाई घटण्याचा नेहमीचा ट्रेंड मोडला आहे.
सोशल मीडियावर अनेक प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. भव्य दृश्यरचना, प्रभावी कथा आणि नोलन यांच्या दिग्दर्शनामुळे ‘द ओडिसी’ला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी या चित्रपटाला ‘मास्टरपीस’ अशीही प्रतिक्रिया दिली आहे.
या दमदार कमाईमुळे ‘धमाल 4’ समोरही ‘द ओडिसी’ने कडवे आव्हान उभे केले आहे. सध्या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत असून, पुढील काही दिवसांत ही लढत अधिक रंगण्याची शक्यता आहे.
‘द ओडिसी’ हा चित्रपट ग्रीक पौराणिक कथेवर आधारित आहे. राजा ओडिसियस आपल्या कुटुंब आणि राज्याच्या रक्षणासाठी धोकादायक प्रवासाला निघतो. या प्रवासात त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नोलन यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे आणि भव्य सादरीकरणामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
