‘रामायण’पूर्वी रणबीर कपूरचा मोठा निर्णय; पुण्यात विकत घेतली कोट्यवधींची जमीन

Ranbir Kapoor Pune Property: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, यावेळी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अयोध्येनंतर आता रणबीरने पुणे जिल्ह्यात मोठी जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

वृत्तानुसार, रणबीर कपूरने पुण्यातील मुळशी तालुक्यात सुमारे 25 एकर जमीन खरेदी केली असून, या व्यवहाराची एकूण किंमत 16.42 कोटी रुपये आहे.

माहितीनुसार, 30 एप्रिल 2026 रोजी या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली. या खरेदीमध्ये पिंपरी गावातील चार लागून असलेल्या भूखंडांचा समावेश आहे. सर्वात मोठा भूखंड 43,800 चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून तो 7.07 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला आहे.

दुसरा 29,900 चौरस मीटरचा भूखंड 4.62 कोटी रुपयांना, तिसरा 21,400 चौरस मीटरचा भूखंड 3.31 कोटी रुपयांना आणि चौथा 8,900 चौरस मीटरचा भूखंड 1.39 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला.

या चारही भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 1,04,000 चौरस मीटर म्हणजेच जवळपास 25.7 एकर आहे. या व्यवहारासाठी सुमारे 82.13 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याची नोंदही कागदपत्रांमध्ये करण्यात आली आहे.

दरम्यान, रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा बहुचर्चित चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीत, तर दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार असून, अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page