Marathi Film Festival 2026: पुण्यात तीन दिवस मराठी चित्रपटांची मेजवानी

Marathi Film Festival 2026, Pune: पुण्यात पुन्हा एकदा मराठी सिनेमाचा रंगतदार सोहळा अनुभवायला मिळणार आहे. २२ ते २४ मे २०२६ दरम्यान सहावा ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला असून, हा महोत्सव पुण्यातील E-Square येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे, हा फेस्टिव्हल प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

Red FM आयोजित या महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिक सहभागी होणार आहेत. गेल्या काही वर्षांत या फेस्टिव्हलने मराठी चित्रपटप्रेमींमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यंदाच्या महोत्सवात समकालीन चित्रपटांसोबत काही गाजलेल्या क्लासिक चित्रपटांचं विशेष प्रदर्शनही होणार आहे. त्यामध्ये ‘Jait Re Jait’, ‘Tighi’, ‘Gondhal’ आणि ‘Dashavatar’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय विविध चर्चासत्रं, पॅनल डिस्कशन्स आणि कलाकारांसोबत संवादाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

या सोहळ्यात महेश मांजरेकर, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव आणि शिवराज वायचळ यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दीर्घ योगदानाचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे.

उदयोन्मुख दिग्दर्शक आणि नव्या कथाकारांना व्यासपीठ मिळावं यासाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमासाठी Film Critics Guild आणि अनुपमा चोप्रा यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.

रेड एफएमच्या संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशा नारायणन यांनी सांगितलं की, प्रादेशिक कथा आणि मराठी सिनेमातील सर्जनशीलता अधिक मोठ्या व्यासपीठावर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. नव्या पिढीतील कथाकारांना प्रोत्साहन देण्याची संधी या महोत्सवातून मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page