या निर्णयावरून राज्यात वातावरण तापले आहे. काही चालक संघटनांनी याला विरोध करत ४ मेपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता अंशुमन विचारे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत, “मराठी मातीत कमवून माज करायचा नाही… मराठी सगळ्यात आधी,” असे स्पष्ट शब्दांत लिहिले.
अंशुमन विचारे यांच्यासह इतर काही कलाकारांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेता हेमंत ढोमे यांनीही याआधी मराठी भाषा शिकण्यावर भर देणारी भूमिका घेतली होती.
दरम्यान, दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी वेगळा पर्याय सुचवला आहे. त्यांनी चालकांसाठी मराठी शिकवण्याचे ऑनलाइन कोर्स सुरू करण्याची सूचना केली आहे. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच परवाना कायम ठेवावा, असे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, ऑटो रिक्षा युनियन या निर्णयाला विरोध करत आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ७५ टक्के चालक हिंदी भाषिक असल्याचा दावा युनियनने केला आहे. या नियमामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
युनियनने स्पष्ट केले आहे की, सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर ४ मेपासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
