अमृता खानविलकरचा रंगभूमीवर प्रवेश, ‘लग्न पंचमी’ नाटकाचं नाव जाहीर

Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर चाहत्यांसाठी मोठी खुशखबर घेऊन आली आहे. अनेक वर्षे चित्रपट, मालिका आणि ओटीटीमध्ये अभिनयाने प्रेक्षकांना मोहून टाकल्यानंतर आता ती पहिल्यांदाच रंगभूमीवर दिसणार आहे.

अमृता ‘लग्न पंचमी’ या नाटकातून थिएटरमध्ये डेब्यू करणार आहे. लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या त्याची जोरदार तयारी सुरू आहे. याचं नाव जाहीर होताच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या दिवशी अमृतानं पोस्ट करत, मनाच्या खूप जवळचा प्रोजेक्ट लवकरच घेऊन येणार असल्याचं सांगितलं होतं. आता त्या प्रोजेक्टचं नाव ‘लग्न पंचमी’ असल्याचं समोर आलं.

या प्रवासाबद्दल बोलताना अमृता म्हणाली, “लग्न पंचमी या नाटकासाठी हो म्हणण्याचं मोठं कारण म्हणजे मी ज्या टीमसोबत काम करतेय ती माझ्यासाठी खूप खास आहे. मधुगंधा कुलकर्णीसारखी अनुभवी लेखिका आणि निपुण धर्माधिकारीसारखा दिग्दर्शक यांच्यासोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी अमूल्य संधी आहे.”

तिनं पुढे सांगितलं की, सिनेमा आणि नृत्य सादरीकरणातून प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालाय, पण रोज रंगमंचावर जिवंत कथानक सादर करणं हा एक वेगळा अनुभव असेल. “प्रेक्षक मला रंगभूमीवर कसं स्वीकारतील याची मला खूप उत्सुकता आहे,” असंही अमृतानं सांगितलं.

याआधी अमृतानं अनेकदा स्टेजवर परफॉर्मन्स दिला असला तरी नाटकातून प्रेक्षकांशी होणारा थेट संवाद हा तिच्यासाठी नवीन अनुभव ठरणार आहे.

मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखन केलेले आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित हे नाटक नव्या वर्षात प्रेक्षकांसमोर रंगणार आहे. अमृता या नाटकातून रंगमंचावर वेगळी छटा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page