Soham Bandekar – Pooja Birari: मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक कलाकारांनी आयुष्यातील नवा प्रवास सुरू केला आणि आता त्यात एका नव्या जोडप्याची भर पडली. सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचा शाही विवाहसोहळा लोणावळ्यातल्या एका सुंदर रिसॉर्टमध्ये पार पडला. लग्नाचे सुंदर फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
सोहम आणि पूजाच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून कानोकानी चर्चा होती, पण दोघांनीही अधिकृतपणे काही सांगितलं नव्हतं. अखेर लग्नाच्या दोन दिवस आधी त्यांनी फोटो शेअर करून आपलं नातं जगासमोर मांडलं आणि आता त्यांच्या विवाहसोहळ्याच्या छायाचित्रांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘येड पेड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारणारी पूजा बिरारी खऱ्या आयुष्यात सोहमसोबत विवाहबंधनात अडकली आहे. मालिकेत लग्नाची तयारी आणि प्रत्यक्ष आयुष्यातील विवाह, असा रील टू रिअल अनुभव तिनं घेतला. शूटिंगदरम्यान सेटवर लगबग होतीच, पण त्याचबरोबर तिच्या खर्या लग्नाची तयारीही सुरू होती. मालिकेतील दृश्यांना कुठेही अडथळा न येऊ देता पूजाने सर्व काम नियोजनबद्धरीत्या पूर्ण केलं.
सेटवर एक भावूक क्षणही घडला. राया आणि मंजिरीच्या केळवणाचं दृश्य शूट करत असताना कलाकारांनी अचानक पूजासाठी खरं केळवण आयोजित केलं. आवडीचे पदार्थ, भेटवस्तू आणि प्रेमळ सहवास अशा वातावरणात तिला सुंदर सरप्राईज मिळालं. तो दिवस तिच्या आयुष्यातला अविस्मरणीय ठरला.
लग्नाच्या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पूजाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान सगळ्यांच्या मनाला भावलं. बांदेकरांच्या घरात आता नवी होम मिनिस्टर म्हणून पूजाचं स्वागत झालं असून तिच्या आणि सोहमच्या सहजीवनाला आज औपचारिक सुरुवात झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
